जैन समाजाचे पवित्र पर्युषण पर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा व्हावा यासाठी राष्ट्पति मा पंतप्रधान व मा.मुख्यमंत्री ना पत्र
सहविचार सभेत सतीश जैन यांचे प्रतिपादन
सर्व प्राणिमात्रांचे कल्याणकारी पर्युषण पर्व अखिल भारतीय जैन समाजाचे' पर्वाधिराज 'पर्युषण पर्व केवळ भारतीय जनतेलाच नव्हे तर अखिल विश्वातील मानव जातीस कल्याणकारी असून विश्व मैत्री व क्षमा प्रधान करण्याचा महत्तम सिद्धांत पर्युषण पर्वाने अर्थात दशलक्षण धर्माने जगापुढे ठेवला आहे. त्यासाठी पर्युषण पर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा व्हावा असे मुक्त विचार पार्श्वनाथ सेवा प्रतिष्ठानचे पद्मावती युवा मंचच्या सहविचार चर्चासत्रात श्री १००८ कुंथुनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त आणि खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख सतीश वसंती लाल जैन (कुसुंबा )यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले अखिल विश्वातील जैन समाजाची परिषद दिल्ली किंवा मुंबई, पुणे ,जळगाव नाशिक आदी अन्य ठिकाणी आयोजित करून नेते विद्वानांना पत्रकारांना आमंत्रित करून पर्युषण पर्वाचे आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्त्व पटवून दिले पाहिजे. 'दश धर्म'' देश धर्म' याविषयी जनजागृती होईल या दशलक्षण धर्माची देशाला आजची सामाजिक गरज कशी आहे त्यात पर्युषण पर्वातील दहा दिवसाचे धर्माची लक्षणे उत्तं क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम सत्य, उत्तम शौच, उत्तम संयम ,उत्तम तप, उत्तम त्याग, उत्तम अकिंचन्य , उत्तम ब्रह्मचर्य हे दश धर्माचे दहा लक्षणे प्रत्येकाने पालन करून आचरणात आणले तर देश शांती सुख समृद्धी कडे वाटचाल करेल या हेतूने सतीश जैन यांनी सदर वृत्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या वृत्ताची मान्यवर दखल घेतील अशी समाजबांधवांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जैन समाजातर्फे प्रति वर्षा प्रमाणे याहीवर्षी ९सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत दहा दिवसीय अखिल भारतात साजरा होणारा जैन धर्मीयांचा पवित्र पर्व पर्वा धीराज पर्युषण पर्व विविध गावात हा पर्व मोठ्या उत्साहाने भक्तीभावाने साजरा होणार असल्याचे वृत्त ठीक ठिकाणाहून प्राप्त झाले आहे. सर्वत्र विखुरलेला समाज असल्यामुळे ज्या स्थळी मंदिर किंवा स्थानक असेल त्या स्थळी पोहोचतात ,अन्यथा ज्या गावात मा .साहेब ,मुनिश्री माताजी, सतिया जी, साध्वी यांचा चातुर्मास असेल त्या ठिकाणच्या उत्सवात सामील होत असतात. आणि आत्मकल्याण साधण्याचा प्रयत्न असतो आणि या अध्यात्म पर्वात सर्व व्यवहार बाजूस ठेवून आत्मशुद्धी साठी कार्यरत असतात. आत्मानंद असे चिदानंद अनुभवण्याचा आत्मोन्नतीचा आत्मशुद्धी चा हा काळ आहे या सहविचार सभेत विश्वस्त महेंद्र हिरालाल जैन ,पारस नवनीतलाल जैन, मयूर रिखबचंद जैन ,स्वप्नील महेंद्र जैन, पंकज नगिनदास जैन, अभय रमेश जैन, राहुल सुंदरलाल जैन, रोशन रवींद्र जैन, राजेंद्र नवनीतलाल जैन, वालचंद रतनलाल जैन ,चंद्रकांत शांतीलाल जैन, विपुल अशोक जैन, नितीन मोतीलाल जैन, रमेश मोतीलाल जैन, प्रमोद पानाचंद जैन, उल्हास राजूलाल जैन, शितल अरुणलाल जैन ,अशोक शांतीलाल जैन, महावीर सुभाषचंद्र जैन,गौरव उल्हास जैन, ओम राजेंद्र जैन ,संम्यक राजेंद्र जैन, मोहित राजेंद्र जैन, आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या