"राष्ट्रसंतांच्या संगती भाविकांच्या मैफिली रंगती" या उक्तीप्रमाणे एकाच धर्मीयांचे श्रद्धास्थान नसून सर्व धर्मियांचे आदर्श तत्त्वाची शिकवण देणारी अनेक संत भारतात जन्मास येतात व आपली प्रखर बुद्धीने लोकांची मने जिंकून घेतात. मानवता धर्माचा विकास हाच त्या संतांचा ध्यास असतो त्यापैकी एक दिगंबर मुनी उत्तर महाराष्ट्रातील हरेश्वर पिंपळगाव जन्मभूमी असलेले खान्देश वासियांची भूषण तपस्वी कल्पवृक्ष कलशाकार तीर्थक्षेत्राचे प्रणेते प.पू. आचार्य श्री 108 कल्पवृक्षनंदी जी महाराज यांचे शनिवार 25 रोजी सायंकाळी ७.३० वाजता सम्यक समाधी अर्थाता समाधीमरण झाली. 26 रोजी दुपारी कल्पवृक्ष कलशाकार क्षेत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले मृत्यूवर विजय मिळवणारे आचार्य कल्पवृक्ष नंदी महाराजांनी मृत्यूला मंगलमय कसे केले व मृत्यु महोत्सव कसा याविषयी खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख व खान्देश जैन पत्रकार सतीश वसंतीलाल जैन (कुसुंबा - धुळे) यांनी पुज्यपाद आचार्य वाणीतुन मृत्यू महोत्सवा विषयी विशेष माहिती देण्याचा इवलासा प्रयत्न.
या भूतलावर रोज हजारो लाखो लोक जन्म घेतात जगण्यासाठी सर्वच जगतात पण या जगात फारच थोडे महापुरुष असतात कि जे आपल्या मातापित्यांच्या कुळाचा व राष्ट्राचा उद्धार करतात व येणार्या शेकडो पिढ्यांसाठी आपल्या आदर्शाचा वारसा ठेवून जातात मुनिश्री आचार्य कल्पवृक्ष नंदीजी आपल्या त्यागमय व संयमी जीवनाने देशाला सत्य अहिंसा व शांतीचा मार्ग दाखवून गेले. प.पू. कल्पवृक्षनंदीजी महाराजांनी फर्दापूर तांडा ता. सोयगाव येथील कल्पवृक्ष कलशाकार तीर्थक्षेत्र येथे चातुर्मास स्थित असताना सल्लेखना घेतली होती (संथारा). या साधनेत समाधी पूर्वक 25 सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७.३० वाजता देह त्याग केला सल्लेखनाव्रतास विजय मिळविला म्हणजे त्यांचे संयमी महानिर्वाण झाले मृत्यू अटळ आहे. मृत्यू केव्हा येणार हे निश्चित नाही हे आपण म्हणतो परंतु महाराजांनी मृत्यूवर विजय संपादन करून जैन शास्त्राप्रमाणे अंतिम समयी कुठल्या भावभावना जागृत ठेवतात व कोणत्या इच्छाशक्तीवर ताबा मिळावा हे संपूर्ण जगाला प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिले शेकडो लोकांच्या उपस्थितीत आणि स्वतःच्या इच्छेनेच त्यांची प्राणज्योत यमसलेखनाद्वारे निर्वाण झाले. आजच्या भौतिक जणू मोक्ष संपादन केले. जैन धर्म मृत्यूच्या साक्षात्काराची कलाही शिकवतो. मुनीश्रींच्या दर्शनासाठी विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने पोहोचत होते. जैन धर्म वास्तवात जीवन जगण्याची कला शिकवतो. मृत्यूच्या साक्षात्काराची कलाही शिकवतो. संलेखनापूर्व उपवास करून देहत्याग करणे हे सार्थक जीवनाचे सार आहे. मुनीश्रीनी त्यागपूर्वक आत्मसमाधी मिळवण्यासाठी मोठ्या साहसाने मृत्यूला निमंत्रण दिले होते. अशी माहिती सतीश वसंतीलाल जैन कुसुंबा यांनी दिली.
जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. अटळ आहे मृत्यूपासून कोणीही वाचवू शकत नाही पण त्या मृत्युला आपण मंगलमय बनवू शकतो भौतिक वस्तू मध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती होते ही भावनाच कल्पना आहे ज्या घराला आपण अत्यंत परिश्रमाने स्वतःच्या देखरेखीखाली आपल्या इच्छेनुसार बनविले ज्यात प्रवेश करते वेळी आपण मंगलगीत व वाद्याचे आयोजन केले आनंद अनुभवला त्याच घरातून मरणानंतर रडत, उर बडवत बाहेर काढले जाते ज्याच्या जन्माच्या वेळी आनंदोत्सव साजरा केला जातो त्यांच्याच मृत्युच्या प्रसंगी रडारड होते अर्थात कोणतीही भौतिक वस्तू सर्वथा सुख प्रदान करणारी नाही. आचार्य यांनी सांगितले की जसे जन्माला मांगलिक शुभ बनविले जाते तसे मरणाला सुद्धा मांगलिक बनवले जाऊ शकते जर आपल्यापाशी ज्ञान असेल, विवेक असेल, तर जो मानव मरणाला मांगलिक बनवू शकत नाही, त्याच्या जीवनात व पशु च्या जीवनात कोणताही फरक राहिलेला नाही. मरणाला मांगलिक बनविण्यासाठी जीवनात धर्माची व ज्ञानाची आवश्यकता आहे. आचार्यांनी म्हटले आहे की जन्माला तर सगळेच प्राणी येतात पण जगण्याची कला सर्वांना प्राप्त होत नाही जगण्याची कला धर्मानेच प्राप्त होते जगण्याचे कले बरोबर मरणाला मांगलिक बनवण्याच्या विधी सुद्धा धर्मानेच शक्य आहे जगात असा कोणताही धर्म असेल की जो शांतीपूर्ण मरण श्रेष्ठ असण्याचे सांगणार नाही. असा कोणता मानव असेल की जो शांतिपुर्ण मृत्यूची कामना करत नसेल मृत्यू अवश्य भावी (अटल) आहे त्यामुळे दुःखाने अशांती ला मरण्यापेक्षा सर्वजण शांतीने आपले प्राण निघून जावेत अशी कामना करतात. ज्याप्रमाणे जन्माला श्रेष्ठ मानले जाते त्याप्रमाणे मरणसुद्धा श्रेष्ठ आहे. कारण मरण ही भावी जीवनाची सुरुवात आहे शुभ शांत किंवा अशुभ क्लेशमय अशांत अंत भावी शुभ किंवा अशुभ जीवनाची सुरुवात आहे. पूज्यपाद आचार्य आणि मृत्यूबरोबर महोत्सव हा शब्द वापरला आणि त्याला मृत्यु महोत्सव हे नाव दिले. जन्मोत्सवाची कल्पना भावना तर सगळेच बाळगतात परंतु जैन जैन दर्शना मध्ये तर मृत्यू सुद्धा केवळ उत्सव नसून तो महोत्सव आहेत असे मानले गेले आहे. सम्यक दृष्टी जीव जाणतो की मरण आत्मा चे नव्हे तर शरीराचे होते त्यामुळे तो त्या वेळी परमात्मा चे नामस्मरण करेल यासाठी 'भागवत' मध्ये प्रायोपवेशन हा शब्द वापरला गेला आहे आणि जैन धर्मात समाधी मरण, सुलेखना, संथारा ,मृत्यू महोत्सव, आदी नावे दिलेली आहेत.
0 टिप्पण्या