ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालयाचा 84 टक्के निकाल..
जामनेर प्रतिनिधी विठ्ठल चव्हाणजामनेर (प्रतिनिधी):- येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्याल इयत्ता बारावी *🔸विज्ञान शाखेचा निकाल 94.11 %* लागला असून चव्हाण प्रसाद वासुदेव हा विद्यार्थी 56.30% मिळून विद्यालयातून प्रथम आला आहे. तर काळे किशोर भगवान 55.53% मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. आणि सोनानी पायल गणेश ही 55.23 टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
*वाणिज्य शाखेचा निकाल 90.90% लागला असून राजेश विष्णू राठोड ह्या विध्यार्थ्याला 72.30 % मार्क मिळून वाणिज्य शाखेत प्रथम आलेला आहे. द्वितीय क्रमांकाने पंकज सुदाम पवार हा 71.53 %मिळून उत्तीर्ण झाला. तर तृतीय क्रमांकाने प्रियंका कैलास गोरे ही 67.38% मिळून उत्तीर्ण झाली.
कला शाखेचा निकाल 66.66 %* लागला असून सविता गोपीचंद लोखंडे ही विद्यार्थीनी76.15% मिळवून कला शाखेतून विद्यालय प्रथम आलेली आहे .तसेच द्वितीय क्रमांकाने निकिता मंगेश पगारे ही 70.76% मिळवून उत्तीर्ण झाली. तर तृतीय क्रमांकाने प्रीति यशवंत राठोड ही विद्यार्थीनी एकूण 68.92 %गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय आ. गिरिश भाऊ महाजन (माजी मंत्री वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य) व विद्यालयाच्या सचिव सौ. साधनाताई महाजन (नगराध्यक्षा जामनेर) सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे सर व सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

0 टिप्पण्या