जामनेर तालुक्यातील कोरोना रुग्णावर जामनेरातच उपचार होण्यासाठी प्रयत्नशील - जिल्हाधिकारी अभिजित राऊत जामनेरला घेतली आढावा बैठक.
जामनेर प्रतिनिधी विठ्ठल चव्हाणजामनेर (प्रतिनीधी):- शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्यामुळे कोरोना रुग्णाना जळगाव व साकेगाव येथे पाठविण्यात येत होते.त्यामुळे त्यांची हेळसांड होत होती.आता उपजिल्हा रुग्णालयात व्हेंडिलेटर साठी ऑक्सिजनचे पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असून ते लवकरच पुर्ण होणार असल्याने जामनेर तालुक्यातील कोरोना रुग्णावर आता शहरातील उपजिल्हा रुग्णालयातच उपचार होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दि.१५ रोजी सायंकाळी उपजिल्हा रुग्णालयाला विझिट प्रसंगी दिली. तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने रुग्ण संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेतली.त्यानतंर त्यांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालय, जी. एम.हॉस्पिटल,पळासखेडे बुद्रुक येथील कोविड सेंटरला भेट दिली.त्यावेळी तहसिलदार अरुण शेवाळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील,पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, प. समिती बी. डी. ओ. एन.आर.पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.के. पाटील,डॉ.हर्षल चांदा,डॉ.प्रशांत पाटील,डॉ.जयश्री पाटील, जितेंद्र पाटील, डॉ.प्रशांत भोंडे, अरविंद देशमुख,आदी.

0 टिप्पण्या