निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य कार्यकारिणीवर जळगावचे किशोर पाटील कुंझरकर

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य कार्यकारिणीवर जळगावचे किशोर पाटील कुंझरकर 


प्रतिनिधी नूरुद्दीन मुल्लाजी

.दिनाक १४ .अहमदनगर     निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र या संस्थेच्या 2020 ते 2025 राज्य कार्यकारिणीची निवड अध्यक्ष वनश्री आबासाहेब राजाराम मोरे यांनी जाहीर केली असून जळगाव जिल्ह्यातील उपक्रमशील सेवा भावी शिक्षक तसेच पर्यावरण सहकार, शिक्षण, पत्रकारिता साहित्य , सामाजिक कार्य,चळवळीतील क्रियाशील कृतिशील व भरीव कार्य असलेले पदाधिकारी राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या सामाजिक शैक्षणिक पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील यथोचित कार्याची दखल घेऊन राज्य कार्यकारिणीवर प्रमुख संघटक पदी निवड जाहीर करण्यात आली .सदरील धडपडी सेवाभावी व्यक्तिमत्त्वाची निवड झाल्याने राज्यातील सर्वच क्षेत्रातून या निवडीचे अभिनंदन होत आहे. राज्य कार्यकारिणीवर प्रमुख संघटक पदी निवड झाली आशयाचे पत्र संस्थेचे राज्याध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी नुकतेचदिले. या यथोचित निवडीने धडपडी व कृतिशील व्यक्तिमत्त्वाचा उचित गौरव झाल्याचे समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले. पर्यावरण संवर्धन पर्यावरण रक्षण पर्यावरण विषयक जनजागृती त्या जोडीने पर्यावरणासाठी सातत्याने किशोर पाटील कुंझ रकर यांनी विविध व्याख्यानातून प्रबोधन देत असतानाच आपल्या संघटन कौशल्य शिस्तबद्धता यातून राज्यभर पुढाकार घेतला असल्याचे वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी म्हटले. पर्यावरण जनजागृतीच्या क्षेत्रात पर्यावरण प्रेमींना सोबत लिहून त्यांच्या मार्गदर्शनाने कार्यरत राहण्याची संधी मिळाल्याने पर्यावरण प्रेमी युवक ,युवक मंडळे शासनाच्या योजना यात शक्य तेवढे सकारात्मक करण्यासाठी संधीचे सोने करू पर्यावरण विषयक जनजागृती अधिक व्यापक प्रमाणात सर्वांच्या मार्गदर्शन आणि सहकार्य व समन्वयाने करूअसे निवडीबद्दल बोलताना नूतन राज्य कार्यकारिणीचे प्रमुख राज्य संघटक किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. संस्थेमार्फत दरवर्षी पर्यावरण संमेलनाचे आयोजन केले जाते. निवडी बद्दल अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे , नगर सचिव प्रमोद मोरे कार्य अध्यक्ष गोरख शिंदे, उमाजी बिसेन भंडारा, विलासराव महाडिक, गौतम सांवत, नवनाथ लाड ,तुकाराम अडसूळ,मंजुषा कराळे,सूरज टकले पुणे रवींद्र महलले यवतमाळ, निर्मला म्हस्के औरंगाबाद, मधुरा सोहनी रत्नागिरी, पंकज गणवीर चंद्रपूर,आदी निसर्ग मंडळ मित्र परिवार तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, जिल्हा अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी  बी एस अकला डे, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी जे पाटील डॉक्टर डी एम देवांग, राजेंद्र सपकाळे, विजय पवार, विकास पाटील,विश्वास पाटील, नरेंद्र चौधरी, अर्जुन साळवे, अरुण जाधव, विक्रम अडसूळ, एस डी भिरूड ,संभाजी पाटील,बालाजी जाधव, शौर्य भारती, रामदास वाघमारे, सिद्धार्थ माशाळे, राजनंदा पिसे, डॉक्टर वाय आर सोनवणे, मधुकर घायदार,बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे, पुष्पलता पाटील, पुष्पलता मुळे, राज्य व जिल्हा सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी तसेच सर्व दैनिक पत्रकार बांधव , मित्र परिवार आदींनी तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या शिक्षक संघटनेच्या राज्य समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, सर फाउंडेशन, एटीएम परिवार चे सर्व सदस्य आदींनी  किशोर पाटील कुंझरकर यांच्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या राज्य कार्यकारिणीवर राज्य प्रमुख संघटक पदी यथोचित निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या