आत्मनिर्भर निधीतून आपल्या व्यवसायाला उभारी द्या -- खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन

आत्मनिर्भर निधीतून आपल्या व्यवसायाला उभारी द्या -- खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन


खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या पुढाकारातून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्हा अभियानाचा शुभारंभ

चाळीसगांव प्रतिनिधि
चाळीसगाव ---  देशात सध्या कोविड:१९ या कोरोना महामारीमुळे पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला असून याची जाणीव केंद्र सरकारला आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये पथविक्रेत्यांना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे त्यांच्याजवळ खेळते भांडवल नसल्याने त्यांचे व्यवसाय अडचणीत आलेले आहेत. अर्थव्यवस्थेच्या महत्वाचा घटक असलेल्या पथविक्रेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी आत्मनिर्भर निधीची घोषणा केल्याने या योजनेतून  जळगाव जिल्ह्यातील पथविक्रेते, फेरीवाले, हातगाडी विक्रेते,भाज्या, फळे, तयार खाद्य पदार्थ, चहा, भजी पाव, अंडी, कापड, वस्त्र, चप्पल, कारागीर द्वारा उत्पादित वस्तू विक्रेता पुस्तक स्टेशनरी तसेच केश कर्तनालय, चर्मकार, पान दुकाने, कपडे धुलाई व लॉड्री दुकानदार असे लहान मोठे बारा बलुतेदार व्यावसायिकांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पुरवठा तातडीने करण्यासाठी १०,००० रु. पर्यंत खेळते भांडवल देण्याचा निर्णय घेतला आहे. यांचा लाभ जळगाव लोकसभेतील सर्व शहरात राहणारे आणि ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या पथविक्रेत्यांनी लाभ व्हावा यासाठी जनजागृती अभियान सुरू केले असून खेळते भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे. रविवार सकाळी नऊ वाजता  शिवाजी घाट परिसरात या योजनेसाठी जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी चाळीसगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आशालता चव्हाण रावी संचालक विश्वासराव चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, पालिकेतील गटनेते नगरसेवक संजय पाटील, भाजप तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील माजी उपसभापती संजय तात्या पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे, माजी पस सदस्य रवींद्र चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नरेन काका जैन ,रोशन जाधव ,माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी नगरसेवक मानसिंग राजपूत, अरुण अहिरे, माजी नगरसेवक राजेश चौधरी, अड. प्रशांत पालवे, दिलीप गवळी, भरत गोरे, गौरव पुरकर, समकित छाजेड, पप्पू राजपूत, दिनकर राठोड, मंजूर ईलाही, गणेश चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला नगरपरिषद अधिकारी किरण निकम, सोनाली मोगलाइकर यांनी प्रास्तविक केले. खासदार उन्मेश दादा पुढे म्हणाले की
 सदरील योजना हि १००% केंद्र सरकार पुरस्कृत आहे. शहरातील पथविक्रेते व ग्रामीण भागातुन शहरात येणारे पथविक्रेते यांना  १०,००० रु. पर्यंत खेळते भांडवल पुरवठा करण्यात येणार असून अतिशय सोपी प्रक्रिया भरून यात   तात्पुरते विक्री प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, बॅंक पास बुक झेरॉक्स हे घेऊन आपल्या शहरातील जवळचे ई सेवा केंद्र, (CSC सेंटर) येथे जावून ही माहिती भरावायची आहे. यासाठी माझ्या कार्यालया शेजारी देखील फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून आपला व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू करावा अशी विनंती त्यांनी उपस्थित विक्रेत्यांना केली.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या