नगरदेवळा एस. के. पवार विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम
नगरदेवळा :प्रतिनिधि शहेबाज़ शेखफेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या इयत्ता 12 वी च्या परीक्षेत नगरदेवळा येथील सरदार एस के पवार विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे.विद्यालयाचा एकूण निकाल 91.66%इतका लागलेला आहे. यात विज्ञान विभागाचा निकाल 91.62% , कला विभागाचा 91.75% तर किमान कौशल्य विभागाचा निकाल 93.75% इतका लागला . विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा मान जयेश रामकृष्ण गढरी या विद्यार्थ्याने 78.46%घेत मिळवला तर विजय जगन पाटील या विद्यार्थ्याने 76.31% गुण संपादन करून विद्यालयातून द्वितीय येण्याचा बहुमान मिळवला आहे.पूनम दिपकसिंग परदेशी या विद्यार्थिनीने 75.69% गुण मिळवत विद्यालयातून तिसरी आली . सुयश संपादन करून विद्यालयाचा नावलौकिक वाढविणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्राम शिक्षण समितीचे सर्व संचालक मंडळ,तसेच विद्यालयाचे प्राचार्य व्ही .बी .बोरसे , उपप्राचार्य एस .एल .महाजन पर्यवेक्षक एस के पवार परिवारातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद,ग्रामस्थ व पालकांनी हार्दिक अभिनंदन केले.
*गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी ( विज्ञान शाखा )*
*1) जयेश रामकृष्ण गढरी - 78.46%*
*2)निलेश मनोज शिंपी -75.23%*
*3)एकनाथ भगवान महाजन -75.00%*
*कला विभाग*
*1)पूनम दिपकसिंग परदेशी -75.69%*
*2)आरती हिरामण भोई -72.30%*
*3)शिंदे वर्षा सुनिल -71.84%*
*किमान कौशल्य विभाग*
*1)विजय जगन पाटील -76.31%*
*2)ज्ञानेश्वर भटू पाटील -69.69%*
*3)गायकवाड सागर दशरथ -66.00%*
*उर्दू माध्यम*
*1)सैय्यद फिरदौस जहाँ नासीर अली :-52.46%*
*2) शेख रश्मीन बानो मो .हुसैन :-51.69%*
*3)शेख मुस्कान रशीद :-68.76%*
*4)शेख रहीम जयनोद्दीन -60.70%*

0 टिप्पण्या