पाचोरा येथे लॉकडाऊन काळात अडकलेला अलोक सिंग यास आई वडिलांन कडे सोपवले
तालुका पाचोरा प्रतिनिधी शहेबाज शेख
पाचोरा गेल्या तीन चार महिन्यांपासून कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात सर्वत्र लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे.त्याकाळात अलोक सिंग (वय 15) दिल्ली वरून मुंबई येथे ट्रेनने जात असतांना तो पाचोरा रेल्वे स्टेशन वर उतरा असता काही नागरिकांना आढळून आला.त्या स्थानिक नागरिकांनी अलोक यास पाचोरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 14 दिवस क्वांरटाईन करण्यात आले होते.अलोक यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेवण आणि झोपण्याची उत्तम सोय तेथिल कर्मचारी वर्गानी केली होती.त्यास अधून मधून सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र माझा चे पत्रकार कुंदन बेलदार हे त्यास भेटुन अलोक चा आई वडीलांन सोबत फोनवर विडीओ कॉल करूण बोलणं करूण देत होते.असे तीन चार महिन्यांपासून सुरू होतं.त्यानंतर त्यांचा आई वडिलांनी पत्रकार कुंदन बेलदार यांना फोन केला असता त्यांनी सांगीतले आम्ही अलोक ला घेण्याकरीता विरार मुंबई येथून येणार आहोत. अलोकचे वडील प्रमोद बजरंग सिंग.आई अंजू प्रमोद सिंग,मामा सुनिल शिवनारायण यादव,हे दिनांक16 जुलै गुरूवारी रोजी पाचोरा शहरात अलोक यास घेण्याकरीता आले.अलोक सिव्हील हॉस्पिटलमध्ये सापडला नाही.इकडे तिकडे परीसरात शोध घेवून अलोक यास त्याचा आई-वडील- मामा यांचा ताब्यात दिले.अलोक यास त्यांचा आईने बघीतल्यावर त्यांचे अश्रुअनावर झाले.अखेर अलोक प्रमोद सिंग त्याचा आई-वडीलांन सोबत विरार मुंबई येथे रवाना झाले.त्यांनी सर्वांचे आभार मानले.त्यावेळी मोलाचे सहकार्य,बबलू मराठे(अॅम्बुलंस ड्राव्हर)
अमोल,, सिव्हिल किशोर लोहार, अॅम्बुलंस ड्राव्हर, कर्मचारी,रणजित जगताप,मनोज पाटील,शैलेश बागुल,आधारवड चे युवा कार्यकर्ते,प्रविण पाटील,सागर पवार, गणेश सोनार,वाल्मीक तेलंग,मनोहर पुजारी,भुषण देशमुख,राहूल पाटील.पत्रकार कुंदन बेलदार आदिंचे सहकार्य लाभले.

0 टिप्पण्या