सर्व इमारत बांधकाम बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून घर मालक सर्व सुविधा मिळवून देण्याबाबत जळगाव मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन
जिल्हा जळगाव
मा , जिल्हाधिकारी सो,जळगाव
विषयः सर्व इमारत बांधकाम बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर तसेच घर मालक यांनी महानगरपालिका, नगरपालिका ,ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी घरे विक्री करतांना पक्के रोड गटारी इलेक्ट्रिकल चे पोल पाणी इत्यादी सुविधा पूर्ण करून दिल्यानंतरच संबंधितांना कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्याबाबत
अर्जदार: राजेंद्र निकम जिल्हाध्यक्ष रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग जळगाव
महोदय
उपरोक्त विषयांवर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव रस्ते साधन सुविधा व आस्थापना याद्वारे आपणास निवेदन सादर करतो कि ,
आज शहरांमध्ये व गावांमध्ये बरेच बिल्डर कॉन्ट्रॅक्टर छोटे-मोठे ठेकेदार हे शहराच्या बाहेर घराचे बांधकाम करीत आहेत कारण त्या ठिकाणी संबंधितांना जागाही स्वस्त दरात मिळत असते व त्या जागेवर घराचे बांधकाम करून ती विक्री केल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर मोबदला हा मिळत असतो तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिक पूर्ण झालेली घरे ही खरेदीदार यांच्याकडून पूर्ण पैसे घेऊन त्यांना खरेदी करून देतात तसेच शासनाला सुद्धा संबंधित घर घेणारे हे पूर्ण रक्कम देत असतात तसेच संबंधित घर खरेदी करणार त्या वेळी त्या घरांमध्ये राहायला जातात तेव्हा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तेव्हा ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर बांधकाम व्यावसायिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु संबंधित लोक त्यावेळेस त्यांना टाळाटाळ करून त्यांचा वेळ काढून घेत असतात तरी संबंधितांनी घरे विक्री करण्यापूर्वी खालील सुविधा पूर्ण करूनच घराची विक्री करावी
*1 ) संबंधितांनी मंजूर प्लॅन नुसारच घराचे बांधकाम करावे*
*2 ) तसेच घरापर्यंत येण्या-जाण्यासाठी पूर्ण पक्का रस्ता तयार करून देण्यात यावा*
*3 )घराचे सांडपाणी जाण्यासाठी गटारांची व्यवस्था करानाकटारे ची व्यवस्था करण्यात यावी*
*4 ) घरामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा करून देण्यात यावी*
*5 ) तसेच घराबाहेर पथदिवे लावून देण्यात यावेत*
तरी वरील प्रमाणे संपूर्ण सुविधा संबंधितांनी घर विक्री करते वेळी देण्यात यावेत अन्यथा आपल्या स्तरावरून संबंधितांना बांधकामाचे कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्यात येऊ नये
तरी यापुढे जोपर्यंत वरील सुविधा मिळणार नाही तोपर्यंत जनतेने पाणीपट्टी कर, घरपट्टी कर, तसेच इतर सर्व प्रकारचे कर हे शासनास भरणार नाही असा इशारा या पत्राद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्यासह पदाधिकारी सादर करीत आहोत
*टिप : आपणावर कोणीही अधिकारी यांनी घरपट्टी पाणीपट्टी भरणे साठी एक सारखा तगादा लावला तर आपण ताबडतोब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात संपर्क साधावा*
प्रत माहीतीस्वत सादर
1 ) मा , ना ,मुख्यमंत्री सो, महाराष्ट्र राज्य, मुंबई
2 ) मा , आयुक्त सो जळगाव शहर महानगरपालिका जळगाव
3 ) मा , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव
4 ) मा , टाऊन प्लॅनिंग ऑफिस जळगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना जळगाव जिल्हा अध्यक्ष राजेंद्र निकम
तालुका अध्यक्ष रस्ते आस्थापना गणेश नेरकर
तालुका उपाध्यक्ष रस्ते आस्थापना आर डी राव
रस्ते आस्थापना जळगाव शहर उपाध्यक्ष गोविंद जाधव
विषाल कुमावत
कृष्णा लोंढे
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


0 टिप्पण्या