साधना माध्यमिक विद्यालयात आर्ट विभागाची विद्यार्थिनी रोशनी चौधरी प्रथम
कासोदा
प्रतिनिधी / अर्तजा मुल्लाजी
ज.जि. म.वि.प्र. सह.संस्था संचलित साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासोदा चा ज्यू. काॅलेज आर्टस् विभागाचा 12वी चा निकाल 63.07 % तर व्यवसाय शिक्षण विभागाचा निकाल 71.43 % लागला .आर्टस् विभागाची कु. रोशनी संजय चौधरी 66.30 % गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिचे व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब श्री. विरेंद्रजी भोईटे,मानद सचिव भाऊसाहेब शर्ती. निलेशजी भोईटे , विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमेटी चेअरमन बापूसाहेब श्री. मच्छिंद्र रतन पाटील , संस्थेचे संचालक बापूसाहेब श्री. एस.आर. पाटील , विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब श्री. जी. के. सावंत व स्टाफने अभिनंदन केले आहे.

0 टिप्पण्या