आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना, पनवेल शासकीय आदेशानुसार सदर मानधनवाढ सप्टेंबर २०१९ पासूनच लागू करावी आणि मागील थकीत रक्कम तात्काळ अदा करावी अशी मागणी

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना, पनवेल 


शासकीय आदेशानुसार सदर मानधनवालढ  सप्टेंबर २०१९ पासूनच लागू करावी आणि मागील थकीत रक्कम तात्काळ अदा करावी अशी मागणी 

पनवेल प्रतिनिधी 
आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करा व त्यांना मानधन लागु करा या आपल्या मागणीमुळे त्यांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा करण्याचा महत्वपुर्ण निर्णय राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. 
एकुण ७४ प्रकारची कामे करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना त्यांच्या कामानुसार मोबदला मिळतो. मात्र त्यांना कायमस्वरुपी काही रक्कम मानधन म्हणून मिळावी या मागणीसाठी आपली संघटना सातत्याने प्रयत्नशील होती. अखेर २५ जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत २००० रु. मानधन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या आदेशानुसार राज्यातील सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका व ३५०० गटप्रवर्तकांना मानधनवाढीचा लाभ होणार आहे. परंतु शासनाने सदरची मानधनवाढ सप्टेंबर २०१९ पासून न करता जुलै २०२० पासून लागू केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
 संघटनेच्यावतीने सततच्या पाठपुराव्याअंती आज अखेर आशा स्वयंसेविकांना २००० तसेच गटप्रवर्तकांना ३००० महिना मानधन लागु झाले आहे. हे आपल्या संघटनेच्यावतीने सततच्या पाठपुराव्याचे यश आहे. 
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दि. १६ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासकीय आदेशानुसार सदर मानधनवाढ  सप्टेंबर २०१९ पासूनच लागू करावी आणि मागील थकीत रक्कम तात्काळ अदा करावी अशी मागणी कायम आहे.
सदर मागणी शासनाने मान्य करावी यासाठी संघटना प्रयत्नशील आहे
मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी. पाटील, युवराज पी. बैसाणे, ॲड. गजानन थळे, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे, सर्व संघटना पदाधीकारी व कार्यकर्ते



Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या