ए टी टी ऊर्दु हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेजचे घवघवीत यश

ए टी टी ऊर्दु हायस्कुल अँड  ज्युनियर कॉलेजचे  घवघवीत यश

मालेगाव (प्रतिनिधी श्री. के आर.शेख)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेने फेब्रुवारी/ मार्च  2020 बाराहवी चा निकाल ऑनलाइन जाहीर केला त्यात येथील ए टी टी उर्दू हायस्कूल  आणि ज्युनियर  कॉलेजच्या निकाल 91.80 टक्के लागला. या परीक्षेत आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या  तिन्ही शाखेचे एकूण 525 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यात 482 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
त्यात बाराहवी आर्ट्स ची अफिफा राशिद अख्तर हिने 82 टक्के गुण मिळवून प्रथम स्थान प्राप्त .केले तर बाराहवी सायन्सचे अब्दुल हाफिज मोहम्मद यासीन  याने 84 टक्के गुण मिळवून प्रथम स्थान संपादन केले. तर बाराहवी कॉमर्स मध्ये राजा सायमा अली इमरान हिने 87.69 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचे बहुमान प्राप्त केले.
 मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, ए टी टी हायस्कूल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य व स्टॉफ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या