पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
पारोळा : तालुक्यातील भिल समाज विकास मंच ची कार्यकारणी बैठक महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख तथा जळगाव जिल्हाध्यक्ष मा दिपक अहिरे एरंडोल,यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या वेळी समाजाची तळमळ आणि समाजकार्याची आवड असणारे तरुणांना पद देऊन काम करण्याचे बळ दिले आहे नियुक्ती करण्यात आलेले पदधिकारी पुढील प्रमाणे, रविंद्र वाघ ( जळगाव जिल्हाउपाध्यक्ष ) , बापु देवरे ( पारोळा तालुकाध्यक्ष ) , आप्पा मोरे ( पारोळा तालुकाउपाध्यक्ष ) , विकास गायकवाड ( पारोळा तालुका सचिव ) , युवराज सोनवणे ( पारोळा तालुका कार्याध्यक्ष ), रोहिदास ठाकरे ( पारोळा तालुका सल्लागार ), अनिल सोनवणे ( पारोळा तालुका संघटक ), यांची निवड करण्यात आली आहे बैठकीस संपर्क प्रमुख तथा जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे यांनी 21 मार्च रोजी शिंदखेडा येथे होणारे पहिले राज्यस्तरीय भिल सम्मेलना बाबत मार्गदर्शन केले सम्मेलनास जास्तीत जास्त संख्येने येऊन मा राज्यपाल महाराष्ट्र व महाराष्ट्र सरकार च्या लक्ष वेधण्यासाठी उपस्थित राहण्याचे अव्हाण केले...
व तालुक्यातील नवनियुक्त पदधिकारी यांनी आदिवासी समाजासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाज बांधवांना व्हावा या साठी प्रयत्न करणार असल्याने तालुक्यातील नवनियुक्त पदधिकारी यांनी सांगितले तालुक्यातील सर्व समाज बांधवांना विकास मंच च्या नेतृत्वाखाली संघटीत करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले या वेळी सदस्य व समाज बांधव उपस्थित होते....
कोड
( भिल समाजावर होणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सरकार व राज्यपाल यांच्या लक्ष वेधणयासाठी 21 मार्च रोजी भिल सम्मेलन होणारच..)
दिपक अहिरे
महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख

0 टिप्पण्या