प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी
कासोदा येथील कापडाचे व्यापारी श्रीराम गणपती बियाणी ,शैलेश श्रीराम बियाणी व सौ सपना शैलेश बियाणी हे कासोदा येथे अवैध सावकारी व्यवसाय करत असल्याची तक्रार कासोदा येथील श्यामलाल जमनालाल सुतार, संजय आत्माराम चौधरी ,सौ उज्वला संजय चौधरी राहणार एरंडोल, दयाराम सखाराम चौधरी, सौ कलाबाई दयाराम चौधरी राहणार बांभोरी खुर्द या पाच व्यक्तींनी जिल्हा उपनिबंधक कार्यालय जळगाव यांच्याकडे लेखी तक्रारीने केली होती त्यानुसार जिल्हा उपनिबंधक यांनी एकाच वेळी तीन गुप्त पथक तयार करून त्यांचे वास्तव्य असलेल्या कासोदा येथील घरी एक पथक, दुसरे पथक त्यांच्या मेन रोड वरील कापड दुकानावर तर तिसरे पथक जळगाव येथे असलेल्या त्यांच्या राहत्या घरी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एकाच वेळी तीन ठिकाणी तीन पथक गेल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ सांगितले याप्रसंगी त्यांनी कासोदा येथील घरात असलेले खरेदी खताचे स्टॅम्प व इतर स्टॅम्प आढळून आले ते पंचनामा करून एक एक गठ्ठ्यात बांधून जिल्हा उपनिबंधक कार्यालय जळगाव येथे पाठवणार असल्याचे के. पी. पाटील सहायक निबंधक एरंडोल यांनी सांगितले. कासोदा येथे दोन पथक आले होते त्यापैकी एक पथक के.पी .पाटील सहाय्यक निबंधक एरंडोल व त्यांच्या सोबत चार सहाय्यक कर्मचारी असे होते दुसरे पथक जी.एच.पाटील सहाय्यक निबंधक अमळनेर व त्यांच्या सोबत सहाय्यक कर्मचारी चार असे होते.

0 टिप्पण्या