रेल्वे च्या भोंगळ काराभाराबाबत शंका येऊ लागली आहे, लोंढे आणण्यासाठी बंद असलेल्या सर्वच रेल्वे Covid-19 स्पेशल नांव देऊन सुरू करण्यात आल्यात व राज्यभरासह आपल्या खान्देशवासीयांनाही मूर्ख बनविण्याचा कुटील डाव आखण्यात आला, एकीकडे गरिबांसाठी कोरोना चा डर तर दुसरीकडे श्रीमंतांना आरक्षित तिकीटांचा भडीमार करण्यात आला, एका खेड्यातून दुसऱ्या व जवळच्या तालुका शहरात, जिल्ह्यात जाण्यासाठी ची ग्रामीण जनतेची पॅसेंजर बंद करण्यात हुशारकी मिळविणाऱ्या रट्टेबाज, निद्रिस्त अधिकारी वर्गाला या सामूहिक त्रासाची बाब लक्षात आणून देण्यासाठी आपआपल्या स्थरावर रेल्वे रोको करणे गरजेचेच झाल्याचे दिसत आहे, ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटना ट्रेन सुरू होणे, सामान्य तिकीट मिळणे, मेमु तात्काळ धावणेसाठी वेळोवेळी प्रयत्न करीतच आहे, आता अंत पाहू नये व नुकतेच चाळीसगांव तालुक्याचे केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचे आमदार यांनी रेल रोको बाबत 7 दिवसांच्या दिलेल्या अलटीमेटलमला भुसावळ मंडळाने केराची टोपली दाखवत रेड सिग्नल दिलेला आहे, व या निवेदनातील अलटीमेटमला कुठलीही हवा भुसावळ मंडळाकडून न मिळाल्याने आमदार साहेबांनीही यलो सिग्नल पकडत आपल्या म्हणण्याप्रमाणे 7 दिवस उलटले तरीही रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने काहीच घेतले नसल्याने येत्या 2 ते 5 दिवसाच्या आत जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या शब्दाला टिकत या आंदोलनाला ग्रीन सिग्नल देत रेल रोको करून या निद्रिस्त भुसावळ मंडळाला जाग आणणेसाठीचे प्रयत्न करणे गरजेचे झालेले आहे, व तसे करावे या गंभीर बाबीसाठी ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटना आमदारांसोबत राहीलच, तसेच खानदेशातील इतर पण केंद्रात व राज्यात सत्तेची चाख चाखणारे इतकी गम्मत गरीब ग्रामीण जनतेची पाहतील व एक शब्द ही आपल्या मुखातून वा लेखणीतून न काढता अप्रतिम शांतता ठेवतील असे वाटले नव्हते, आणि जनतेला हे समजणार नाही इतकीही मूर्ख जनता नाही,
सर्वच प्रवाशी, चाकरमानी, सामान्य जनता, राजकीय नेते व पत्रकार बंधूनिही या विषयात लक्ष घालणे गरजेचे असल्याचे वेदनादायी भावनेने भरलेले मत ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले.

0 टिप्पण्या