शाळकरी मुल,महिला व नागरिकां तर्फे स्वयफुर्तिने रस्ता रोको आंदोलन

 

प्रतिनिधी  नुरुद्दीन मुल्लाजी

  हलीमा अपारमेंट- एचपी पेट्रोल पंप जवळ महामार्ग बंद

 स्पीड ब्रेकर झालेच पाहिजे रैम्प व अंडरपास रस्ता सुरु करा - मागण्यांचे घोषणा

सहाय्यक पोलीस अधीक्षक चिंता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिकारे सह राष्ट्रीय महामार्गाचे विश्वजय बागळकर ची उपस्थिती

जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी दिनांक १६ डिसेंबर रोजी दिलेल्या रस्ता रोको आंदोलनाच्या नोटीस प्रमाणे राष्ट्रीय महामार्गाने कामे न केल्याने २१ डिसेम्बर रोजी सकाळी  ११ वाजता शाळकरी विद्यार्थी, महिला व नागरिक यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४ वर बसून रस्ता रोको आंदोलन केले.

 आंदोलन स्थळी फारुक शेख यांचे मनोगत

 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला २०१८ पासून २०२१ च्या शेवटपर्यंत केलेला पत्रव्यवहार, निवेदन व त्यावर राष्ट्रीय महामार्गाचे  तसेच माननीय जिल्हाधिकारी यांचे लिखित मिनट्स ऑफ मीटिंग सर्वासमक्ष वाचून व समजून सांगितले. सालार नगरचा फ्लाय ओव्हर ची मागणी जुनी असताना त्यानंतरच्या डॉक्टर अग्रवाल चौक व प्रभात कॉलनी चौक यांच्या मागण्या मंजूर झाल्या परंतु सालार नगर अंडरपास मंजूर झाला नाही, एवढेच नव्हे तर अंडरपास ऐवजी तात्पुरत्या स्वरूपात मोठा बोगदा करण्याचे लिखित आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही,  जुन्या अंडरपास ब्रिज मधून  शाळेचा रस्ता तयार करून दोघी सर्विस रोड लागलीस तयार करून देतो या लिखित व तोंडी आश्वासनाला सुद्धा चंद्रकांत सिन्हा हे जुमानत नसल्याने नाईलाजास्तव हा रस्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याचे शेख यांनी नमुद केले.

चंद्रकांत सिन्हा यांचे पोलिसांना आश्वासन

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी मोबाईल द्वारे फारुक शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिकारे यांना आश्वासन दिले की २१ डिसेंबर च्या संध्याकाळपर्यंत दोन्ही ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्यात येईल तसेच रैम्प चे काम सुद्धा दोन दिवसात पूर्ण होईल असं सांगितले व घटना स्थळी आलेले राष्ट्रीय महामार्गाचे  बागळकर यांनीसुद्धा आंदोलकांना कबूल केले त्यामुळे हे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले

सालार  नगर वासीयाची मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शिव कॉलनी येथील मध्यवर्ती कार्यालयास घेराव घालून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा  फारुक शेख यांनी केली असता हजारोंच्या उपस्थितीत लोकांनी त्यास टाळ्या वाजून मान्यता दिली.

सालार नगरवासीयांची मागणी रास्त व पूर्वीची असल्याने शहरातील मान्यवरांसह सालार नगर, अक्सा नगर मधील महिला पुरुष व शाळकरी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती त्यात प्रामुख्याने आताऊल्ला खान, उमर शेख ,मुस्ताक बादलीवाला, मुस्ताक पटेल, एडव्होकेट अमीर शेख ,अनीस शाह, आरिफ शेख, सलीम इनामदार, अलफ़ैज़ पटेल ,अन्वर खान, जाहिद शाह,अकील मनियार, खालीद खाटिक, सहिद फयाज, खालील शेख, जुबेर देशमुख, हाजी अशरफ, मतीन सय्यद ,शब्बीर सय्यद, आरिफ शेख ,इस्माईल शहा, महिलां तर्फे आयशा मुस्ताक, आयेशा शेख, हाजरा शेख, अफसाना तय्यब, सुरय्या असिफ ,नसरीन शेख, नसीम शेख, शबाना शेख, शाळकरी विद्यार्थ्यांना तर्फे मोहम्मद जावेद आयान, आरिफ उमेर रफिक मावेस खान , साहिल अल्फा ,आसीम शेख,हमजा तय्यब ,तलहा तय्यब, अदनान मुक्तार ,साबिन अरशद, आयान अल्तमश,  यासह शेकडो लोकांची उपस्थिती 

स्पीड ब्रेकर झालेच पाहिजे- झालेच पाहिजे, हम सब एक है ,हमारी मांगे पुरी करो, आमचा रस्ता -आमचा हक्क, चंद्रकांत सिन्हा मुर्दाबाद, आदी घोषणांनी महामार्ग दणाणून निघाले.

 सुमारे दहा ते पंधरा मिनिटं महामार्ग दोन्ही बाजूने बंद करण्यात आले असल्याने वाहनांची लाईन मोठ्या प्रमाणात लागली होती.

 एमआयडीसी पोलीस स्टेशन, आरसीएफ प्लाटून, शहर वाहतूक शाखा ,राज्य गुप्तवार्ता विभाग आदींची उपस्थिती व  त्यांचा बंदोबस्त चोख होता.




Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या