कर्जास कंटाळून जवखेडे सिम येथील शेतकऱ्याची आत्महत्या




जवखेडेसिम (ता.एरंडोल) येथील
 ३६ वर्षीय
शेतकऱ्याने 11 मार्च दुपारी बारा वाजेच्या सुमारास विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबत माहिती अशी, की जवखेडेसिम येथील अनिल साहेबराव पाटील उर्फ भैया (वय-३६) यांची चार एकर शेती असून त्यांचेवर विविध कार्यकारी संस्थेचे व खासगी हात उसनवारीचे कर्ज होते. यावर्षी अनिल पाटील यांनी कपाशीची लागवड केली होती, मात्र अतिवृष्टीमुळे कपाशीसह अन्य पिकांचे अपेक्षित उत्पन्न न आल्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते कायम राहत होते. आज सकाळी अनिल पाटील हे घरात आढळून न आल्यामुळे त्यांचे वडील साहेबराव पाटील यांनी गावातील नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. रवींद्र भाईदास पाटील, शालिक बळीराम पाटील यांनी अनिल पाटील यांचा शोध घेतला असता ते आढळून आले नाही.रवींद्र पाटील आणि शालिक पाटील याना अनिल पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांचे कपडे आढळून आल्यामुळे त्यांनी विहिरीत असता त्यांना एक प्रेत तरंगताना दिसून आले. रवींद्र पाटील, बापू पाटील यांचेसह गावक-यांनी अनिल पाटील याना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आनलेअसता ते मयात झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. मयत अनिल पाटील यांच्या पच्छात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत रवींद्र भाईदास पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. युवा शेतक-याने कर्जास कंटाळून आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी शोकाकुल वातावरणात अनिल पाटील यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या