भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे पुण्यतिथी निमित्त माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.कलाम यांना माजी शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) शशिकांत हिंगोणेकर यांच्या अध्यक्षतेखाली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.जळगाव येथील कुमूद प्रकाशनाच्या ऑफिसात दि.२५ जुलै २०२२ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी प्रख्यात साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते डॉ.कलामांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.संत शिरोमणी सावतामाळी यांच्या पुण्यतिथीच्या औचित्याने सावता माळी यांच्या प्रतिमेचे पूजन अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी भिशी अंतर्गत राबविलेल्या कार्यक्रमांचा अहवाल संक्षेपाने सादर केला.कार्यक्रमाच्या पुढील नियोजना संदर्भात संक्षेपाने सांगोपांग चर्चा करण्यात आली.अध्यक्षीय भाषणात हिंगोणेकर यांनी डॉ.कलाम यांच्यातील क्रांतदर्शी शिक्षकत्वाचे अभिजात गुणवैशिष्टये सांगून समर्पित राष्ट्रसेवेतील प्रेरक प्रसंग सांगितले. कलाम लिखित पुस्तकांवर त्यांनी साक्षेपी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी केले.याप्रसंगी ललित लेखक डॉ.विजय बागुल,मानवसेवा शाळेचे गिरीश माळी सर,कलाशिक्षक शामकांत वर्डीकर,दीपक साळुंके,शिरीष नागरे,युवराज पड्यार उपस्थित होते.


0 टिप्पण्या