पारोळा येथे मुख्यमंत्री दौऱ्यावर येत असतांना त्यांचा निषेध व्यक्त करणाऱ्या ठाकरे गटाचे कार्यकत्यासमवेत पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध


पारोळा जि जळगाव
पारोळा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर येत असतांना त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी एरंडोल तालुका शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांना पारोळा बायपास येथे ताब्यात घेण्यात आले याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली डी.वाय. एस. पी. वाघचौरे, एरंडोल पी. आय. जाधव,जामनेर पी. आय. किरण शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पारोळा पोलीस स्टेशन ला स्थानबद्ध केले... यावेळी माजी जि.प.सदस्य नाना महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदिश पाटील, तालुकाप्रमुख रवि चौधरी, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, शिवसेना शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेना तालुकाप्रमुख गुलाबसिंग पाटील, युवासेना शहरप्रमुख प्रमोद महाजन, परेश बिर्ला, अमोल भावसार, बाळा राजपूत, मोहन महाजन उपस्थित होते 





Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या