शिवसेना युवा सेनेच्या विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी ज्ञानेश्वर कंखरे यांची नियुक्ती

तळई तालुका एरंडोल 
नुकताच भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या ज्ञानेश्वर मृत्युंजय कंखरे यांनी शिवसेना शिंदे गट या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी एरंडोल पारोळा विधानसभा चे माजी आमदार श्री चिमणरावजी पाटील व एरंडोल पारोळा विधानसभेचे आमदार श्री अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मी शिंदे गटात प्रवेश केला व त्यांना युवा-सेना विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. काल 11 जानेवारी 2024 रोजी झालेल्या तळई येथील कार्यक्रमामध्ये हा प्रवेश झाला त्याप्रसंगी पक्षाचे वरिष्ठ अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या