जवखेडे सिम येथील शेतकरी गोरखनाथ भदाणे यांचा प्रामाणिकपणा.- चुकून आलेली अतिवृष्टीची रक्कम केली परत


जवखेडे सिम ता एरंडोल

जवखेडे सिम तालुका एरंडोल येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ माधवराव भदाणे, यांच्या  बँकेच्या खात्यावर चुकून निपाणे येथील शेतकरी  यांच्या खात्यावरील अतिवृष्टी ची रक्कम चुकून  जमा झाली, सरसकट  रक्कम जमा झाल्याने गोरखनाथ माधवराव भदाणे यांच्या खात्यावर जमा झाल्याने ती  रक्कम त्यांनी बँकेतून स्वतःची रक्कम समजून काढून घेतली , प्रशासनाच्या लक्षात आल्याने ताडे चे तलाठी मुंडे अप्पा यांनी जवखेडेसिम चे लोकनियुक्त सरपंच दिनेश बापू आमले यांच्याशी संपर्क करून माहिती दिली,तसेच तहसीलदार मॅडम यांनी सुद्धा संपर्क केला ,त्या नंतर तात्काळ  त्याच  दिवशी लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले यांनी गोरखनाथ भदाणे यांच्याशी संपर्क करून त्यांना सत्यता सांगितली व चुकून  तुमच्या खात्यावर जमा झालेली रक्कम प्रशासनाला परत करायची आहे त्यांनी  लगेच होकार देऊन  आज रोजी तहसीलदार एरंडोल सौ सुचिता चव्हाण यांची भेट घेतली तहसीलदार मॅडम यांनी गोरखनाथ भदाणे यांच्या प्रामाणिक पणाबद्दल सत्कार केला व प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल अभिनंदन केले व ती चुकून जमा झालेली रक्कम बँक खात्यात भरण्याचे सांगितले , त्यांच्या प्रमाणिकपणाबद्दल  सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे, गोरखनाथ भदाणे जवखेडेसिम चे   बी.एस. फ. जवान  विजयकुमार भदाणे यांचे वडील आहेत.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या