कासोदा प्रतिनिधी नुरुद्दिन मुल्लाजी
कासोदा येथुन जवळचं असलेल्या एरंडोल तालुक्यातील तळई येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराज यांची यात्रा भरते गेल्या अनेक वर्षापासून बारा गाड्या ओढण्याची परंपरा सुरू आहे. दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ध्वज काठीची धनगर मढी पासून विधिवत पूजा करून भगत समाधान भगवान पाटील यांचे सह इतर नागरिकांनी बारा गाड्या ओढण्यास सुरुवात केली. बारा गाड्यांच्या साईडला असलेल्या चाकांकडून इतर युवक व नागरिक हे या बारा गाड्यांना पुढे ढकलत होते.
बारा गाड्यांना पुढे ढकलत असताना राहुल पंडित पाटील, गोपाल संजय पाटील, महेंद्र समाधान वारुळे हे युवक सुद्धा बारा गाड्या लोटत होते बारा गाड्या लोटत असताना राहुल पंडित पाटील वय २९ वर्ष या युवकाचा पायात पाय अडकल्याने तो खाली पडला त्याच्यामागे धावत असलेले गोपाल पाटील व महेंद्र वारुळे हे सुद्धा खाली पडले या दुर्घटनेत शेवटच्या पाच गाड्यांचे चाक राहुल पंडित पाटील या युवकाच्या पोटावरून, पायावरून निघाले तर गोपाल संजय पाटील व महेंद्र समाधान वारुळे या युवकांच्या पायावरून बैलगाडीचे चाके गेल्यामुळे दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले तर राहुल पंडित पाटील हा युवक जबर जखमी झाल्यामुळे त्यास तात्काळ एरंडोल येथे खाजगी रुग्णालयात आणण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्यास तपासले असता त्यांनी तात्काळ या रुग्णाची तब्येत गंभीर असल्यामुळे त्यास जळगाव येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला म्हणून नातेवाईकांनी त्यास तात्काळ जळगाव येथे हलवण्यात आले उशिरा रात्री एक वाजेच्या सुमारास या युवकाचा मृत्यू झाला.
मयत राहुल पाटील हा जे डी सी सी बँक शाखा निपाने येथे कॅशियर म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चात आजी, आई, वडील,लहान भाऊ पत्नी व 11 महिन्याचा मुलगा असा परिवार आहे.
जखमी असलेला गोपाल संजय पाटील राहणार जोगलखेडा तालुका पारोळा येथील रहिवासी असून आपल्या बहिणीकडे यात्रा पाहण्यासाठी आलेला होता. तर दुसरा जखमी महेंद्र समाधान वारुळे वय २१ हा तळई येथील रहिवासी आहे या दोन्ही युवकांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
मयत राहुल पाटील याच्यावर दुपारी तळई येथे अंतिम संस्कार करण्यात आले या युवकाच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या