जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 21 मार्च2024 रोजी निवडणुकीच्या कार्यक्रम निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे त्यानिमित्ताने एरंडोल विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता पाहता सर्वत्र अंमलबजावणी चे काम जोरात सुरू आहे दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे तर दिनांक04 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे या अनुषंगाने एरंडोल विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे कामे जोर धरू लागली आहे कामे वेळेवर पार पाडण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती केलेली आहे नियुक्ती अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाज जोरात सुरू असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होणे कामे आचार संहिता कक्ष यांचे तर्फे नियमित काम सुरू असून नागरिकांच्या सुविधे करीता नियंत्रण कक्षात 0 25 88 24 48 18 हा फोन नंबर उपलब्ध करून दिलेला आहे
आचार संहिता बाबत अंमलबजावणीच्या काही तक्रारी असल्यास नागरिकांनी या दूरध्वनीवर फोन करून कळवावे असे आवाहन मा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी-एरंडोल श्री मनीष कुमार गायकवाड यांनी केले आहे 16 एरंडोल विधानसभा मतदारसंघ अंतर्गत एकूण 28 6233 इतके मतदान असून त्यापैकी 14 78 88 पुरुष 13 83 35 स्त्रीया 10 तृतीयपंथी मतदार आहेत एरंडोल तालुक्यात 137 पारोळा तालुक्यात 123 भडगाव तालुक्यात 30 मतदान केंद्र अशी एकूण 290 मतदान केंद्र 16 एरंडोल विधानसभा मतदारसंघात निश्चित करण्यात आले आहे 64 इतके शहरी मतदान केंद्र 226 इतके ग्रामीण मतदान केंद्र आहेत त्यापैकी 03 मतदान केंद्र हे महिला संचलित असून 2 मतदान केंद्र हे दिव्यांग संचलित व 1 मतदान केंद्र नव कर्मचारी संचलित (युवा मतदान केंद्र) तसेच मतदार संघात एकूण 14 केंद्र हे क्रिटिकल मतदान केंद्र आहेत 20 मार्च रोजी नोडल व सेक्टर अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या उपस्थितीत 32 सेक्टर अधिकारी यांना मनीष कुमार गायकवाड सहा, निवडणूक निर्णय अधिकारी 03 जळगाव तसेच सुचिता चव्हाण सहा, मतदार नोंदणी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उल्हास देवरे सर तहसीलदार पारोळा देवेंद्र भालेराव निवडणूक नायब तहसीलदार दिलीप पाटील निवासी नायब तहसीलदार मनोहर
राजिंदरे ,ललित पाटील निवडणूक शाखा एरंडोल हे उपस्थित होते
0 टिप्पण्या