कासोदा ता, एरंडोल (नुरुद्दीन मुल्लाजी) जळगाव जिल्हा मतदार संघात भाजपाने स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर केली आहे यांच्या विरोधात शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाणार आहे रावेर मतदार संघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाईल तर उद्धव ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघातुन उमेदवारी दिली जाईल असे ठरले असताना उमेदवारी निश्चित केलेले नाही व घोषणाही झालेली नाही त्यामुळे जळगाव मतदारसंघात कार्यकर्ते व मतदार संभ्रमात असून उलटफुलट चर्चा करताना दिसत आहे या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून डॉक्टर हर्षल माने उप महापौर कुलभूषण पाटील एडवोकेट ललिता पाटील आणि संपदा पाटील यांचे नावाचे चर्चा असून याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे भाजपाने राज्यातील आतापर्यंत 24 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे तर ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यात जळगाव लोकसभेच्या समावेश नाही
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या स्मिता वाघ यांच्या विरोधात एक सक्षम महिला उमेदवार देण्याच्या उद्देशाने संपदा पाटील यांच्या नावाची महाविकास आघाडी कडून विचार होऊ शकतो कारण संपदा पाटील यांचे माहेर अंमळनेर असल्याने कदाचित त्यांना तिथून लीड मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच चाळीसगाव त्यांचे सासर आहे त्यांचे पती उमेश पाटील हे विद्यमान खासदार आहे त्यांच्या व्यक्तिगत प्रेम व मतदारसंघात केलेली कामे पाहता महाविकास आघाडीची उमेदवारी संपदा उन्मेश पाटील यांना दिली जाऊ शकते अशी जोरदार चर्चा मतदार संघात रंगलेली दिसते त्यांना शिवसेना (उबाठा) व शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात त्यांना मदत होऊ शकते हे निश्चित
0 टिप्पण्या