अखेर जवखेडे सिम पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा मंत्री यांच्या हस्ते पत्र देऊन मंजुरी

ता एरंडोल जि जळगाव

आज जवखेडेसिम पाणीपुरवठा योजना मंजुरीचे पत्र पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले यांना आज अजिंठा विश्रामगृह जळगाव येथे देण्यात आले,त्या वेळेस आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, जिप सीईओ पंकज आशिया , जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी  व एरंडोल पाणीपुरवठा विभागाचे वानखेडे साहेब,ग्रामसेवक आर.एस. पाटील, उपस्तीत होते,जिल्ह्यातील व एरंडोल तालुक्यातील  पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्यात अश्या सर्व गावांचे सरपंच ग्रामसेवक उपस्तीत होते,आज अखेर पाणीदार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामूळे 40 वर्षांपासूनची प्रलंबित योजना मार्गी लागली जवखेडेसिम ग्रामस्थांकडून . पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठामंत्री यांचे आभार व्यक्त होत आहे


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या