धुळे " संत शिरोमणी श्री नरहरी महाराज पुण्यतिथी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सुवर्णकार महासंघाच्यावतीने समाज सेवकांचा सन्मान व ई-श्रम कार्ड वाटप रविवारी सायंकाळी शांतूषा नगरात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष केशवराव भामरे होते तर व्यासपीठावर अभिषेक भामरे, जेष्ठ कवी जगदीश देवपुरकर, देवपूरकर, उद्दोजक अजय नाशिकर, अनिता विमाडीक आदी उपस्थित होते. या कार्यक्रम सोहळ्यात स्व. रामदास बाबुराब दुसाने यांच्या मरोणोत्त त्यांच्या परिवारास सुवर्ण कमयोद्धा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच नरहरी महाराज पुतळा समितीचे सचिव शामकांत सोनार, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, कुसुंबा येथील ग्रामीण भागात रूग्णसेवा करणारे डॉ. दीपक सोनार, पत्रकार चंद्रकांत सोनार, भाग्यश्री दिनेश वाघ, सुनील सोनार सुवर्ण भुषण' पुरस्कार देऊन सन्मानिक करण्यात आले.
प्रतिकात्मक स्वरूपात ई श्रम कार्डचे वाटप
सुवर्णकार समाजाचा जरी पारंपारीक व्यवसाय असला तरी आज समाजाचा अनेक सर्वसामान्य समाजबांधव शिवकाम, रिक्षाचालक, बांधकाम मजूर तसेच अन्य व्यवसाय व मजूरी मोठ्या प्रमाणात करतात अशा समाजबाधवांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी संत नरहरी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गेल्या काही दिवसांपासून ई श्रम कार्ड नोंदणी सुरू केली होती.आतापर्यंत शंभराहून अधिक बाधवांनी नोंदणी या मोहिमेत केली होती. अशा समाजबांधवांना घरपोच कार्ड वाटप केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र सुवर्णकार महासंघाचे अध्यक्ष दिनेश विभांडिक यांनी दिली. यावेळी पत्रकार गौरव आहिराव, भूषण वडनेरे, श्यामसुंदर विसपुते, पी. एन. विसपुते, राजेंद्र विभाडीक, विजयानंद मोरे, सुधीर पोतदार, भटू थोरात, अॅड. विजय वाघ, कैलास विसपुते, अमित सोनार, अॅड. सुनील देवरे, योगेश विभाडीक, आनंद दुसाने, अविनाश थोरात, सुरज आहिराव, संजय विभाडीक, प्रकाश विसपुते, सुयोग विभाडीक, मिलींद बाविस्कर, भूषण मोरे, हरीश भामरे, महेंद्र सोनार, राकेश गाळणकार आदी उपस्थित होते
0 टिप्पण्या