नाव : संदेश दिनेश अगावणे. वय : 10 . गावं : ता.बार्शी . जि. सोलापूर
संदेश अगावणे या मुलाला जन्मता किडनी खराब होती. संदेश चा आई वडिलांनी त्याला एका प्राव्हेट हॉस्पिटल मध्ये त्याची तपासणी साठी घेऊन गेले.डॉक्टरांनी त्यांना किडनी संदर्भात काही टेस्ट करायला सांगितले. टेस्ट चे रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी त्याचा आई वडिलांना सांगण्यात आले कि एक किडनी पूर्ण पणे खराब झाली आहे. आणि त्या एका खराब किडनी मुळे दुसरी सुद्धा किडनीला प्रॉब्लेम येत आहे. डॉक्टरांनी त्यांना लवकरात लवकर ऑपरेशन करण्याची सल्ला दिला . डॉक्टरांनी त्यांना 2 ते 3 लाख चा वरती खर्च येणार असं सांगितले.संदेश चा वडिलांची आर्थिक परिस्थिती नसल्याकरणाने त्यांना काही सुचत नाही होते. त्यांनी भरपूर ठिकाणी पैसे ची मदत मागितली पण कोणी त्यांना मदत केली नाही.संदेश चे वडिलांचे जवळचे मित्र श्री संतोषभाऊ कुलकर्णी यांनी मुंबईतील आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क करा अशी सल्ला त्यांनी दिली.श्री संतोष कुलकर्णी यांनी श्री जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क केला. श्री जितेंद्र पाटील यांनी संदेश चे सर्व रिपोर्ट व्हाट्सअप द्वारे मागून घेतले. श्री जितेंद्र पाटील यांनी संदेश च्या आई-वडिलांना कॉल करून सांगितले की. मुलाला घेऊन तुम्ही मुंबईला या. मुंबईला आल्यावर तुम्हाला कुठलाही खर्च लागणार नाही. असे सल्ला श्री जितेंद्र पाटील यांनी त्यांना दिली.संदेश ला घेऊन त्याचे आई वडील दुसऱ्या दिवशी घेऊन आले.श्री जितेंद्र पाटील यांनी एका नामांकित प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये संदेश ला ॲडमिट करण्यात आले. हॉस्पिटल ला आल्यावर डॉक्टरांनी त्याचे किडनी चे काही रिपोर्ट करून घेतले. आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले.संदेश चे काही दिवसानंतर त्याची किडनीचे ऑपरेशन झाले. ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झाल्यानंतर. संदेश चा आई वडिलांनी श्री जितेंद्र पाटील यांना कॉल वर सांगितले की संदेश चे ऑपरेशन एकदम व्यवस्थित झाले. ऑपरेशन झाल्यावर संदेश ला 18 ते 20 दिवस हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आले. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यावर संदेशच्या आई-वडिलांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले. संदेश ला एक नवीन जीवनदान भेटल्यामुळे संदेशचा आई-वडिलांना आनंद गगनात मावत नव्हता.संदेश बरा झाला म्हणून हॉस्पिटलच्या परिसरामध्ये पेढे वाटप केले. आणि श्री जितेंद्र पाटील यांचे आभार व्यक्त करत त्यांचे पूर्ण कुटुंबीयांनी श्री जितेंद्र पाटील सोबत फोटो काढले.व आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचे संदेश चा आई वडिलांनी मनःपूर्वक खूप खूप आभार मानले....
0 टिप्पण्या