कॉफी विथ यंग सायन्स इनथ्यूझ़ी​अस्ट वेद अकॅडमी व नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडिया चा आगळावेगळा उपक्रम


ता भडगाव जि जळगाव
येथील नेहा मालपूरे यांच्या संकल्पनेतुन विज्ञान दिनानिमित्ताने वेद अकॅडमी आयोजीत कॉफी विथ यंग सायन्स इनथ्यूझ़ीअस्ट या उपक्रमाला नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने आज सुरुवात झाली. या विज्ञान सप्ताहाचे उद्घाटन प्रा डॉ दिपक मराठे यांनी करत व आपल्या अध्यक्षीय भाषणातुन मूलांना मार्गदर्शन केले. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याध्यक्ष प्रशांत गुरव यांनी मूलांना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या. 
भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात गेल्या ७५ वर्षाची विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती, इतिहास विद्यार्थ्यांना, युवकांना कळावा, त्याचा प्रसार व्हावा व विज्ञान संवाद वाढावा या ऊद्देशाने एक खारिचा वाटा म्हणून विज्ञान दिनानिमित्ताने या वेगळ्या विज्ञान सप्ताहाचे आयोजन केले आहे. 
या उपक्रमाचा आरंभ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ साइंस एजुकेशन अँड रिसर्च पुणे येथील युवा संशोधक व अभ्यासक सोनल थोरवे यांच्यासोबत चर्चा व मार्गदर्शनाने झाली. अगदी सहज सोप्या आणि ओघवत्या भाषेत त्यांनी मुलांसमोर संपुर्ण विश्वाच्या पसार्यात आपला पत्ता नेमका कुठे आहे, खगोलशास्र विषयी संकल्पना तसेच रोजच्या विज्ञान अभ्यासाव्यतिरीक्त देखील खुप रंजक विज्ञान आपल्या बाजुला आहे, असे आपल्या मार्गदर्शनपर गप्पांतून सांगितले. 
आजच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नेहा मालपूरे यांनी केले व आभार सातारा जिल्हाध्यक्ष ओंकार शेठे यांनी मानले. सदर उपक्रमासाठी नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲड राहुल वाकलकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच यशस्वीतेसाठी नि:स्वार्थ प्रतिष्ठानचे अविनाश जावळे, नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाचे अनिल बाविस्कर, पूजा पाटील, धनश्री ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य व जळगाव सदस्य तसेच सर्व शाळांचे सहकार्य लाभत आहे.

हा सप्ताह २१ फेब्रुवारी पासुन २६ फेब्रुवारी पर्यंत असुन, यात ६ युवा संशोधक व अभ्यासकांसोबत विद्यार्थ्यांना गप्पा मारण्याची व मार्गदर्शनाची संधी मिळणार आहे. उपक्रमाची सांगता २७ फेब्रुवारी रोजी असून; संपूर्ण सप्ताहाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आव्हान वेद अकॅडमीच्या संकलिका तसेच ,
भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जळगाव जिल्हा समन्वयक नेहा मालपूरे यांनी केले आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या