वनकोठे (प्रतिनिधी) :
वनकोठे येथील गरीब मोलमजुरी करणारा व्यक्ती श्री.खंडू धना भोई यांच्या स्वतःच्या मालकीच्या २ बोकड तसेच ३ मोठ्या बकऱ्या अंदाजे ७००००/- हजार रुपये किमतीच्या बकऱ्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेले ,त्यांचा उदर निर्वाह याच व्यवसायावर चालत होता. तो व्यक्ती त्यांच्या पासून मिळणारी रक्कम मुलीच्या लग्नासाठी जमवत होता, आता आपला उदरनिर्वाह कसा चालणार , मुलीच्या लग्नाचा खर्च कसा होणार याची चिंता त्या व्यक्तीला आहे. तसेच भोई यांनी त्यांच्या जवळच्या पोलिस स्टेशन ला चोरीची तक्रार दाखल केली आहे.

0 टिप्पण्या