ग्रामीण भागातल्या महिलांचं आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्याचं कार्य अविरतपणे करणार्या मदुरा फायनान्स आणि क्रेडिट ॲक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं चाळीसगाव मधील पाटोदा,वडगाव लांबे,नागद या गावात शानदार कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ३ अंगणवाड्यांना 0 ते 6 वयोगटातील मुलांना 20 खुर्च्या,4 मोठ्या खुर्च्या आणि 2 सतरंजी वाटप करण्यात आले.
शाखा कार्यक्षेत्रातल्या अंगणवाड्यांची यासाठी निवड करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. अंगणवाडीत अनेक लहान मुले बर्याचवेळा झोपी जातात.
त्यांना चांगला आराम मिळावा, यासाठी कंपनीनं हा उपक्रम हाती घेतला. मदुरा कंपनी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांत कार्यरत असून सन २००६ साली या कंपनीची स्थापना करण्यात आल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.
मदुरा कंपनीचे विभाग प्रमुख शैलेश लोहकरे, शाखाधिकारी-संतोष महाजन व सहकारी-अजय झाल्टे, अजय जाधव, वैभव पोहनकर , अविनाश निकम, रेवण सहाने,आकाश पगारे तसेच उपस्थित प्रमुख पाहुणे पंचायत समिती सभापती सरपंच- उपसरपंच आणि आंगणवाडी कर्मचारी, पालक, शिक्षिका- बचतगटांचे सभासद या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

0 टिप्पण्या